महाराष्ट्र शासन भूमि अभिलेख विभाग
गट-क संवर्गातील सरळसेवेने रिक्त पदे भरण्याबाबतची जाहिरात २०२१ शासन मान्यता पत्र क्रमांक
भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमुह ४ (भूकरमापक तथा लिपीक) संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी विहीत अर्हता धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांकडून स्पर्धात्मक परीक्षेसाठी केवल ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावयाची सुविधा विभागाच्या https:landrecordsrecruitment2021.in व https:/imahabhumi.gov.in या संकेतस्थळावर दिनांक ०९/१२/२०२१ ते ३१/१२/२०२१ पर्यंत उपलब्ध राहील.
भरती प्रक्रिया कार्यक्रम
१ अर्ज ऑनलाईन भरण्याचा कालावधी
दिनांक ०९/१२/२०२१ सकाळी ११.०० ते
दिनांक ३१/१२/२०२१ रात्री २३.५९ पर्यंत
दिनांक ०९/१२/२०२१ ते दिनांक
०१/०१/२०२२ रात्री २३.५९ पर्यंत
2 ऑनलाईन शुल्क भरण्याचा कालावधी
३ परीक्षेचा प्रस्तावित दिनांक
रविवार दिनांक २३/०१/२०२२
आवश्यकतेनुसार परीक्षेच्या दिनांकामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. भरती प्रक्रिये संदर्भातील सर्व कार्यक्रम व सूचना विभागाच्या वरील संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येतील. भरती प्रक्रिये संदर्भातील निर्णयाचे सर्व अधिकार जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (म.राज्य), पुणे यांना राहतील व त्यांचा निर्णय अंतिम राहील. rakarmin भरावयाच्या पदांचा तपशील 1/25 चे नाव व वेतनश्रेणी – भूकरमापक तथा लिपीक, सन स्तर एस-६(रु.१९९०० – रु.६३२००)
ऑनलाईन अर्ज सादर करण्याची पध्दत –
१) उपरोक्त पदांकरीता ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याची सुविधा दि. ०९/१२/२०२१ ते ३१/१२/२०२१ पर्यंत httpslandrecordsrecruitment2021.in व https://mahabhumi.gov.in
या संकेतस्थळावर उपलब्ध राहील.
२) विहित पध्दतीने माहिती सादर करुन दिनांक ३१/१२/२०२१ अखेर अर्ज सादर केलेल्या
उमेदवारांसाठी शुल्क भरण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने रक्कम भरण्याची कार्यवाही दि.०१/०१/२०२२ रोजी २३.५९ वाजेपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यानंतर सदर वेबलिंक बंद होईल.
३) उमेदवाराने आपला वैध ई-मेल आयडी व भ्रमणध्वनी (Mobile) क्रमांक नोंदविणे आवश्यक आहे तसेच सदर ई-मेल आयडी व भ्रमणध्वनी क्रमांक ऑनलाईन परीक्षेचा अंतिम निकाल लागेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे. उमेदवाराने ऑनलाईन अर्जात नोंदविलेला ई-मेल आयडी व भ्रमणध्वनी क्रमांक चुकीचा /अपुर्ण असल्यास, तसेच भ्रमणध्वनी क्रमांक NCPR रजिस्टर्ड (DND) असल्यामुळे संपूर्ण भरती प्रक्रिये दरम्यान त्याव्दारे पाठविलेल्या जाणा-या सूचना, संदेश व माहिती उमेदवारांना प्राप्त न झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. तसेच ई-मेल आयडी व भ्रमणध्वनी संदेश वहनात येणाऱ्या तांत्रिक
अडचणींना भूमि अभिलेख विभाग जबाबदार राहणार नाही. प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याबाबतचा संदेश ई-मेल/एस.एम.एस.द्वारे कळविण्यात येईल. उमेदवाराने आपल्या ई मेल आयडीची कोणत्याही परिस्थतीत इतर व्यक्तीसोबत देवाण-घेवाण करु नये. एखादया उमेदवाराचा वैध ई-मेल आयडी नसल्यास त्याने अर्ज करण्यापूर्वी स्वत:चा ईमेल आयडी तयार करणे आवश्यक आहे.
४) ऑनलाईन अर्जासोबत ऑनलाईन पध्दतीने भरलेले परीक्षा शुल्क कोणत्याही परिस्थितीत उमेदवारास परत केले जाणार नाही. ऑनलाईन शुल्क भरताना बँकेचे इतर शुल्क उमेदवाराला स्वत: भरावे लागतील. परीक्षा शुल्क ऑनलाईन पध्दतीने भरल्यानंतर मिळणान्या ई पावतीची (Transacticorn Successful झाल्यानंतर) प्रत त्वरीत मुद्रण करुन (Printout) स्वत:जवळ ठेवणे आवश्यक आहे.
५) ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याकरीता “Click for Registrator” हा टॅब निवडून त्यामध्ये नाव, संपर्काची माहिती, भ्रमणध्वनी व ई-मेल आयडी नमूद करावा, तद्नंतर “Submit” बटन दाबावे. त्यानंतर उमेदवाराच्या भ्रमणध्वनी व ई-मेल आयडी वर OTP येईल. सदर
OTP टाकल्यानंतर Log-in Id व Password भ्रमणध्वनी व email id द्वारे प्राप्त होईल.