महाराष्ट्र शासन नवीन भरती असा करा अर्ज

-: प्रसिद्धीपत्रक :-
विषय :- महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा – २०२१ परीक्षेकरीता संधी देणेबाबत. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा – २०२१ करीता दिनांक २८ ऑक्टोबर, २०२१ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीस अनुसरून (जाहिरात क्रमांक २४९/२०२१) वयोमर्यादेची कमाल गणना तत्कालिन शासन नियमानुसार
करण्यात आली होती. तथापि, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक:एसआरव्ही- २०२/प्र.क्र.६/कार्या-१२. दिनांक १७ डिसेंबर, २०२१ अन्वये दिनांक ०१ मार्च, २०२० ते दिनांक १७ डिसेंबर, २०२१ (शासन निर्णयाचा दिनांक) या कालावधीत विहित कमाल वयोमर्यादा ओलांडली असेल त्या उमेदवारांसाठी अर्ज सादर करण्याची संधी देण्याचा शासनाकडून निर्णय घेण्यात आला आहे.

ही पण बातमी वाचा लायन्सस काढा

२. शासनाकडून प्रस्तुत दिनांक १७ डिसेंबर, २०२१ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने विषयोंकित परीक्षकरीता दिनांक ०१ मार्च, २०२० ते १७ डिसेंबर, २०२१ या कालावधील कमाल वयोमर्यादा ओलांडली असेल अशा उमेदवारांना
अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात येत आहे. त्यानुसार फक्त दिनांक ०१ मार्च, २०२० ते १७ डिसेंबर, २०२१ या कालावधीत वयाधिक ठरणाऱ्या उमेदवारांनी खालीलप्रमाणे अर्ज सादर करण्याची प्रक्रिया करणे आवश्यक आहे :-

(१) अर्ज सादर करण्याचा कालावधी:- दिनांक २७ डिसेंबर, २०२२ रोजी २७.०० वाजल्यापासून दिनांक ३१ डिसेंबर, २०२१
रोजी २३.५९ वाजेपर्यंत.
(२) ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याकरीता विहित अंतिम दिनांक ३१ डिसेंबर, २०२१ रोजी २३:५९ वाजेपर्यंत.
(३) भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरावयाचे झाल्यास चलनाची प्रत घेणे याकरीता विहित अंतिम दिनांक ०१
जानेवारी, २०२२ रोजी २३.५९ वाजेपर्यंत.
(४) चलनाद्वारे परीक्षाशुल्क भरावयाचे झाल्यास भारतीय स्टेट बँकमध्ये शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक ०३ जानेवारी, २०२२ बँकेच्या कार्यालयीन वेळेत.

३. विषयांकित परीक्षेकरीता दिनांक ऑक्टोबर, २०२१ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीस अनुसरून सहायक कक्ष अधिकारी आणि अथवा राज्य कर निरीक्षक संवर्गाकरीता विकल्प सादर केलेल्या परंतु वयाधिक असल्यामुळे पोलीस उपनिरीक्षक
संवर्गाकरीता विकल्प सादर करू न शकलेल्या उमेदवारांना पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरीता विकल्प सादर करण्यासाठी स्वतंत्रपणे संधी उपलब्ध करून देण्यात येईल. याबाबतची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

ही पण बातमी वाचा टाळेबंदीचे तुणतुणे आणि भीती पसरवणे बंद करा…!

४. वरीलप्रमाणे विहित पद्धतीने व विहित कालावधीत अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांनाच विषयांकित परीक्षेच्या प्रवेशासाठी विचार
करण्यात येईल.
ठिकाण : मुंबई
सहसचिव, जाहिरात
महाराष्ट्र लोकसेवा आयोग

6 thoughts on “महाराष्ट्र शासन नवीन भरती असा करा अर्ज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

wp_footer(); ?>