महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दल भरती

या पदाकरीता ऑनलाईन आवेदन अर्ज प्रक्रिया राबविण्यात येणार नसल्याने उमेदवार यांनी ऑफलाईन आवेदन अर्ज दिनांक ०३/०१/२०२२ ते दिनांक २०/०१/२०२2पर्यंत दररोज सकाळी .०० ते सायंकाळी १७.०० वा पर्यंत समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट ११ नवी मुंबई यांचे कार्यालयातुन व www.maharashtrasrpf.gov.in या संकेतस्थळावरून प्राप्त करून घ्यावा. उमेदवार आवेदन अर्ज बिनचुक व परिपुर्णपणे भरून या कार्यालयास अर्जावर नमुद केलेल्या दिनांकास समश आणुन द्यावेत किंवा स्पीड पोस्टाव्दारे दि. २०/०१/२०२२ रोजी
त्यापुर्वी पोहचतील या बेताने आणुन दयावेत. उमेदवारांनी सदरच्या आवेदन अर्जासोबत खालील नमुद प्रमाणे डिमांड ड्राफ्ट ( राष्ट्रीयकृत बँकेचा असावा) अथवा पोस्टल ऑर्डर समादेशक सहायक, रारापोबल गट क. ११ नवी मुंबई यांचे नावे काढून सदरचा डिमांड ड्राफ्ट ( राष्ट्रीयकृत बँकेचा असावा) अथवा पोस्टल ऑर्डर वर नमुद पत्त्यवर मुळ अर्जासोबत जमा करावा.आवेदन अर्ज बिनचुक परीपुर्ण भरून विहीत मुदतीत प्राप्त न झाल्यास आवेदन अर्जाचा विचार केला जाणार नाही य ची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

ही पण बातमी वाचा पार्ट टाईम घरबसल्या काम २५ हजार पगार

तसेच मुळ आवेदन अर्जासोबत संपुर्ण मुळ कागदपत्राच्या साक्षांकीत केलेल्या छायांकीत प्रती व ३ पासपोर्ट साईज
फोटो जोडणे अनिवार्य राहील. ( मुळ कागद पत्रांची सुची मुदा क.०८ मध्ये दर्शविण्यात आली आहे )
४) अर्जासोबत आकारण्याच्या शुल्काबाबत :- अ.क खुला प्रवर्ग राखीव प्रवर्ग ३००/-
टिप :- आवेदन अर्जासोबत परीक्षा शुल्काकरीता चेक किंवा रोख रक्कम स्विकारली जाणार नाही याची
नोंद घ्यावी. डिमांड ड्राफ्ट ( राष्ट्रीयकृत बँकेचा असावा) अधवा पोस्टल ऑर्डर स्विकारला जाईल. १५०/- 3/7
५) वयोमर्यादा
अ.क. पदनाम
वयोमर्यादा
१ भोजन सेवक | दि. २०/०१/२०२२ रोजी कमीत कमी १८ व जास्तीत जास्त ३८ वर्षे पर्यंत असावे मागासवर्गीयांकरीता ४३ वर्ष (तसेच सामाजिक आणि संमातर | आरक्षणनिहाय उमेद्वारांना शासनाने वेळोवेळी घोषित केल्याप्रमाणे शिथिलक्षम राहील) (शा.नि.क. एस आर व्ही. २०१५/प्र.क.  ४०४/ कार्यालय/१२, दि. २५एप्रील २०१६) २ सफाईगार दि. २०/०१/२०२२ रोजी कमीत कमी १८ व जास्तीत जास्त ३८ वर्षे पर्यंत असावे

ही पण बातमी वाचा शेतकऱ्यांना 2 लाख रुपये विमा

६) अटी व शर्ती :-
१. उमेदवारास फक्त एका पदासाठी व एकाच गटात आवेदन अर्ज सादर करता येईल,

२. सामान्य प्रशासन विभाग सुचना कमांक एसआरव्ही २०००/प्र.क.१७/२०००/१२, दि. ०१/०७/२००५ अन्वये विहित केल्या नुसार व महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र)
नियम २००५ अन्वये शासनाने गट अ,ब,क आणि ड मधील सेवाप्रवेशासाठी प्रतिज्ञापत्र नमुना (अ) आवश्यक अर्हता म्हणून विहित नमुन्यातील लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र सादर करणे अनिवार्य आहे.

३. आवेदन अर्जात आपली उच्चतम शैक्षणिक पात्रता नमुद करावी, त्याबाबतचे प्रमाणपत्र आवेदन अर्जासोबत जोडण्यात यावे.

५. निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र नागरी सेवा अटी व शर्ती,मुंबई राज्य राखीव पोलीस बल अधिनियम १९५१ व मुंबई राज्य राखीव पोलीस बल नियम १९५९, पोलीस १९९९, लागु राहील व तसेच वर्ग ४ संदर्भात शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय/ परिपत्रक/आदेश लागु राहतील.

६. कामाचे क्षेत्र मर्यादा/ठिकाण :- निवड होणारे महिला/पुरूष उमेदवार यांना वारंवार कोणत्याही वेळी गट मुख्यालया व्यतिरिक्त महाराष्ट्र राज्यात कोठेही ( उदा :- गडचिरोली, गोंदिया, चंद्रपुर या
नक्षलग्रस्त प्रभागासह ) तसेच महाराष्ट्र राज्यबाहेर आंतर सुरक्षा बंदोबस्तासाठी कंपनीसोबत जावे लागेल.

७) व्यवसायिक चाचणी बाबत :-
अ.क. पदाचे नाव भोजन सेवक
१०० गुणांची व्यावसायिक चाचणी घेण्यात सफाईगार
येईल सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क. प्रानिम १२१६(प्र.क.६५/१६) १३-अ दिनांक १३ जुन २०१८ नुसार व्यवसायिक चाचणी घेण्यात येईल. कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची त्यांनी ज्या पदासाठी आवेदन अर्ज सादर केला आहे. त्यापदासंबधी गुणांची व्यवसायिक ज्ञानावर आधारित पुर्व व्यवसायिक चाचणी परिक्षा घेण्यात येईल. व्यवसायिक चांचणीच्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार व पद व प्रवर्गानुसार निवड यादी व प्रतिक्षा यादी सामान्य प्रशासन विभागाचे दिनांक १६/०३/१९९९, १३/०८/२०१४ व दिनांक १९/१२/२०१८ चे शुध्दीपत्रकामध्ये दिलेल्या निर्देशानुसार
तयार करण्यात येईल. चाचणी

वरील पदांच्या भरतीसाठी मोठया संख्येने अर्ज प्राप्त झाल्यास सर्व उमेदवारांची व्यावसायिक चाचणी शक्य/व्यवहार्य नसल्यास उमेदवारांची संख्या मर्यादित होण्यासाठी व अधिक सक्षम उमेदवार उपलब्ध होण्याकरीता संबंधित निवडसमिती सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक प्रानिम
१२१६/प्र.क.६५/१६)/१३.अ, दि.१३ जून २०१८ मधील नियम ८ (१) (२) नुसार आधी चाळणी लेखी
परिक्षेचा पर्याय निवडू शकेल.

८) आवश्यक कागदपत्रे :-
१ पदाकरीता धारण करीत असलेल्या विहीत शैक्षणिक अर्हतेची व त्यावरील शैक्षणिक गुणपत्रक
शाळा सोडल्याचा दाखला.
२ जातीचे प्रमाणपत्र
३ महाराष्ट्रातील वास्तव्याचा सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले अधिवास प्रमाणपत्र (डोमासाईल
सर्टिफिकेट) आवश्यक राहील
४ जातीचे वैधता प्रमाणपत्र.
मार्च २०२१ पर्यत वैध असणारे या आर्थिक वर्षामधील नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येईल,
६ अर्थिक दृष्टया दुर्बल घटक (EWS) असलेबाबतचे प्रमाणपत्र.
७ शासकिय/ निमशासकिय अथवा अन्य प्रकारच्या नोकरीत असलेल्या उमेदवारांनी नियुक्ती
प्राधिकाऱ्याचे ना-हरकत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
८ सर्व आवश्यक कागदपत्रे ही. दि. २०/०१/२०२२ पर्यंत निर्गमित केलेले असावेत.
९) महत्त्वाचे सुचना
१ अर्जदारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
२. निवड झालेले मागासवर्गीय उमेदवार यांना नियुक्ती आदेश निर्गमित केलेल्या तारखेपासुन ६
महिनेच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
३ अर्जामध्ये नमुद केलेली माहिती चुकीची अथवा खोटी आढळुन आल्यास संबधित उमेदवार अपात्र
उरेल व कायदेशिर कार्यवाहीस पात्र राहील,
४ भरती पकीयेच्यावेळी उमेदवारास कोणतीही शारिरीक इजा/नुकसान झाल्यास शासन जबाबदार
राहणार नाही
५ भरती प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारची वशीलेबाजी किंवा गैरप्रकारचा अवलंब केल्यास उमेदवारास
अपात्र ठरविण्यात येईल.
६ निवड झालेल्या उमेदवारांची वैद्यकिय तपासणी करण्यात येईल. वैद्यकिय अहवाल प्रतिकुल
असल्यास केलेली निवड व नेमणुक रद्द करण्यात येईल.
७ जाहिरातीमधील काही मुद्दे शासन निर्णयाच्या विसंगत असल्यास शासन निर्णय अंतिम राहील.
८ भरती प्रकिया/परीक्षा स्थगित करणे किंवा रद्द करणे, परीक्षेचा प्रकार (सामाजिक अथवा संमातर
आरक्षणात अशंत:/पुर्णतः बदल करणे, संवर्गनिहाय एकुण रिक्त पदांच्या संख्येमध्ये वाढ किंवा
घट करण्याचे अधिकार तसेच भरती प्रक्रिया संदर्भात वाद, तकार बाबत अंतिम निर्णय घेण्याचे
अधिकार निवड समिती यांना असतील.त्याबाबत उमेदवारास अथवा इतर कोणासही कोणताही
दावा करता येणार नाही)
९ उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीस येतांना सोबत नजीकचे काढलेले पासपोर्ट साईजचे ०३ फोटो
आणणे आवश्यक आहे.
१० निवडसुची कालावधी :- सदर भरतीचे निवडसुची कालावधी हा शासनाने विहित केल्यानुसार
विधीग्राहय राहील, त्यानंतर निवडसुची व्यपगत होईल.
११ कागदपत्र पडताळणी व व्यवसायिक चाचणीच्या वेळी सर्व मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्र सोबत आणणे
आवश्यक आहे. मुळ कागदपत्रे/ प्रमाणपत्रे ही दि. २०/०१/२०२२ पर्यंत निर्गमित केलेले असावेत
मुळ कागदपत्रे/ प्रमाणपत्रे सोबत न आणल्यास उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
१२ समांतर आरक्षण :- रिक्त पदाच्या टक्केवारीनुसार समांतर आरक्षणाची पदे उपलब्ध नाहीत
१३ उमेदवारांना कागदपत्र पडताळणी/व्यवसायिक चाचणी साठी नियोजित स्थळी स्वखर्चाने उपस्थित
राहावे लागेल. त्याकरिता कोणत्याही प्रकारचा दैनिक/प्रवास भत्ता देय राहणार नाही.
१०) परिक्षेचे केंट
समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट क. ११ नवी मुबई कॅम्प बाळेगाव (पोस्ट वाकळण
ता.जि.ठाणे पिन कोड नंबर ४००६१२)येथील कवायत मैदानावर घेण्यात येईल, परीक्षेचा दिनांक व वेळ :- दिनांक २४/०१/२०२२सकाळी ०७.०० वाजता
टिप:- उमेदवारांनी परीक्षेला येताना मुळ शैक्षणिक प्रमापत्रासह व साक्षांकित केलेल्या छायांकित प्रतीसह
हजर राहावे

कार्यालयाचा पत्ता :- समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. ११ नवी मुबई कॅम्प बाळेगाव
दुरध्वनी क्रमांक:- ९१३७७५८४८४ ई मेल apkgr11@rediffmail.com

( संदिप भ. घुगे ) भा.पो.से.
समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क. ११,
नवी मुंबई, कॅम्प बाळेगांव,

 

15 thoughts on “महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दल भरती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

wp_footer(); ?>